राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:07 PM2023-12-08T13:07:19+5:302023-12-08T13:08:14+5:30

राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी हजारो भाविक, मान्यवारांच्या उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

national holiday should be declared on the day of inauguration of ram mandir mahant aniket shastri demand | राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करा, महंत अनिकेत शास्त्रींची मागणी

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी हजारो भाविक, मान्यवारांच्या उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप मोठा आणि ऐतिहासिक असणार आहे. यामुळेच २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस म्हणजे २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे. महंत अनिकेत शास्त्री म्हणाले की, हा सर्व हिंदूंसाठी आनंदाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत, मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारांना आवाहन करतो की, २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, तेव्हा हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करावा, जेणेकरून सर्व देशवासियांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शकेल. 

दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त आणि उडुपी पेजावर मठाचे प्रमुख श्री विश्वप्रसन्न तीर्थ यांनी १६ नोव्हेंबरला सांगितले होते की, २२ जानेवारीला मंदिरात रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भाविकांना अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येईल. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'अभिजीत मुहूर्तावर' मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव, उद्घाटनाच्या दिवशी केवळ आमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल, असेही ते म्हणाले होते. 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना आमंत्रण
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २२ जानेवारीला होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आधीच आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, ट्रस्टने ३००० व्हीव्हीआयपींसह ७००० जणांना आमंत्रण पाठवले आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अधाणी यांचा समावेश आहे. याशिवाय, 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नावाचा समावेश आहे.

Web Title: national holiday should be declared on the day of inauguration of ram mandir mahant aniket shastri demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.