राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था गुजरातला पळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:04 AM2020-07-27T06:04:40+5:302020-07-27T06:04:51+5:30
मध्य भारतातील कामगारांवर अन्याय; प्रयोगशाळाही हलविण्याच्या तयारीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील केंद्रीय
खाण मंत्रालयाच्या अंतर्गत
असलेल्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य (एनआयएमएच) या संस्थेचे विलिनीकरण करून ती अहमदाबाद येथील केंद्रीय आरोग्य व परिवार मंत्रालयाच्या अखत्यारीतील आयसीएमआर अंतर्गत एनआयओएचमध्ये विलीन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटातही ही संस्था स्थलांतरित करण्याची
प्रक्रिया केंद्रीय प्रशासनाने
सुरू केली असून येथील अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून
त्यांना तात्काळ प्रभावाने बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे आदेश
देण्यात आले आहेत. या
निर्णयामुळे मध्य भारतातील खाण कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
मध्य भारतात म्हणजे नागपूर चंद्रपूर, व शेजारच्या राज्यात
खाणींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सर्वांना सोयीचे होईल या हेतूने संपूर्ण भारतात एकमेव असलेली ही संस्था नागपूर येथे २००२ पासून कोलार गोल्ड फिल्ड कर्नाटकवरून स्थलांतरित करण्यात आली. नागपूर येथील एनआयएमएचची सुसज्ज आणि भव्य प्रयोगशाळाही हलविण्याची तयारी सुरु आहे. केंद्राने हा निर्णय गेल्या वर्षी घेतला. त्यासाठी येथील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
केंद्राकडे पाठपुरावा
सामाजिक कार्यकर्त्या व मानवाधिकार अभ्यासक अॅड. अंजली साळवे संस्था वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहे. केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना निवेदनही दिले. संस्थेचे प्रादेशिक कार्यालय नागपुरात राहिले तर मध्य भारतातील कर्मचाºयांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी नागपूरचे कार्यालय हे सेंट्रल झोन म्हणून ठेवावे, असा मार्गही त्यांनी सुचविला आहे.