राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

By ओमकार संकपाळ | Published: April 11, 2023 04:58 AM2023-04-11T04:58:02+5:302023-04-11T04:59:44+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

National party status of NCP revoked Trinamool CPI also removed the status of Election Commission | राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

googlenewsNext

नवी दिल्ली :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आता देशात भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

यांचा राज्य दर्जा रद्द
राष्ट्रीय लोक दल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स (मणिपूर) मध्ये, पट्टली मक्कल काटची (पुडुचेरी), रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (प. बंगाल), मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स (मिझोराम).  

आप राष्ट्रीय का?
दिल्ली, गोवा, पंजाब, गुजरात या चार राज्यांतील निवडणुकांत आप पक्षाने केलेल्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला.

राष्ट्रवादी नागालँडमध्ये ठरला राज्य पक्ष
nराष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसला अनुक्रमे नागालँड व मेघालय या राज्यांत राज्य पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या दोन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा 
निवडणुकांमध्ये या पक्षांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. 
nलोक जनशक्ती पार्टी (रामविलास) या पक्षाला नागालँडमध्ये, व्हॉईस ऑफ पीपल्स पार्टीला मेघालयात तर टिपरा मोथा या पक्षाला त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 

...हा चमत्कार नाही
आप हा अल्पावधीतच राष्ट्रीय पक्ष झाला हा चमत्कार नाही. देशातील कोट्यवधी लोकांमुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. जनतेच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आम्ही पूर्ण करू.
- अरविंद केजरीवाल, आप पक्षाचे संयोजक 

भाकप हा जनमानसात रुजलेला पक्ष
पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणे हे तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. मात्र भाकप हा पक्ष जनमानसात रुजलेला आहे. लोकशाही, सेक्युलॅरिझम, सोशॅलिझम यांना वाचविण्यासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील.
 - बिनाॅय विश्व, राष्ट्रीय सरचिटणीस, भाकप

Web Title: National party status of NCP revoked Trinamool CPI also removed the status of Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.