नॅशनल रेसिंग कार स्पर्धा : पटेल अभियांत्रिकी भारतात तिसरा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 11:04 AM2018-05-05T11:04:53+5:302018-05-05T11:04:53+5:30
शिरपूरच्या विद्यार्थ्यांकडून इलेक्ट्रीकल व इंजिन बेस कारची निर्मिती
शिरपूर (धुळे) : आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकेल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘बाहा -२०१८ नॅशनल रेसिंग कार’ या स्पर्धेत इलेक्ट्रिकल आणि इंजिन बेस कार तयार करुन स्पर्धेत भारतात तिसरा क्रमांक मिळविला. एम बाहा व ई बाहा इव्हेंट ‘बाहा’ ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये बाहा सी इंडिया व्यवस्थापित करते़ दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालय मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. या स्पर्धेत ‘एम बाहा’ व ‘ई बाहा’ असे दोन इव्हेंट असतात.
पेट्रोल व इलेक्ट्रीक वाहनाची निर्मिती ‘एम बाहा’ या स्पर्धेतील गाडी पेट्रोल इंजिनवर चालते तर ‘ई बाहा’तील गाडी इलेक्ट्रीक मोटारवर चालते़ आऱसी़ पटेल अभियांत्रिकी महाविद्यालया मधील विद्यार्थी दरवर्षी या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये निर्मिती ‘एम बाहा’ टीमचे नेतृत्व प्रतिक सोनवणे तर ‘ई बाहा’चे नेतृत्व सोहील दोशीने केले होते़ व्हर्च्यूअल फेज ही स्पर्धा चंदीगड येथे झाली होती़ या फेजमध्ये कॉम्प्युटर ग्राफीक्सचा उपयोग करून गाडीचे डिझाईन व कॅक्युलेशन करून गाडीचे मॉडेल सादर केले जाते. व्हर्च्यूअल फेजनंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच स्वत: बनवलेली ही गाडी पूर्णत: महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये तयार केली गेली़ ‘एम बाहा’ ही गाडी आॅल ट्रेरीन व्हेईकल या प्रकारात मोडते. याचा अर्थ, ती कुठल्याही परिस्थित आणि कुठल्याही रस्त्यावर धावण्यास सक्षम असते. ही गाडी पाच विभागात विभागली जाते. सस्पेशन डिपार्टमेंट, डिझाईन, ब्रेक, स्ट्रेअरींग व ट्रॉन्समिशन विभाग असे पाच विभाग असतात. ही गाडी पेट्रोलवर चालते़ या गाडीत अॅडव्हान्स टेक्नोलॉजीचा वापर केला आहे.
माजी राष्ट्रपतींकडून प्रेरणा ‘ई बाहा’ ही गाडी इलेक्ट्रीकवर चालते़ या गाडीला बनवण्याची प्रेरणा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्याकडून घेतली आहे. त्यांच्या मिशन २०२० ला सत्यात उतरवण्याचा दृष्टीने हे विद्यार्थ्यांचे पाऊल आहे. इंजिन बेस अँड इलेक्ट्रिकल बेस कारचे सादरीकरण ही स्पर्धा पिथमपूर व इंदोर येथे झाली. स्पर्धेसाठी भारतातून ४५० पेक्षा जास्त संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा पहिला टप्पा व्हर्चुअल राऊंड असून त्यात लेखी परीक्षा आणि कार डिझाइनचे सादरीकरण होते़ त्यात येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने इंजिन बेस अँड इलेक्ट्रिकल बेस अशा दोन कार सादर केल्या. यात भारतातून अनुक्रमे ९५ वा आणि ८ वा क्रमांक मिळविला.
इंदौर येथे रेसिंग स्पर्धा दुस-या टप्प्यात कारचे मॉडेल बनवविले गेले व पिथमपूर इंदोर येथे रेसिंग स्पर्धा घेण्यात आली. दुस-या टप्प्यासाठी इलेक्ट्रिकल आणि इंजिन कारसाठी भारतातून अनुक्रमे ३२ आणि ११९ संघांची निवड करण्यात आली़ त्यात आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि इंजिन बेस कार मध्ये भारतातून अनुक्रमे ३ रा व २१ वा क्रमांक पटकाविला.
संघप्रमुखासह ५० विद्यार्थ्यांचा सहभाग
अंतिम वर्ष अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांमधून इंजिन बेस कारच्या संघात प्रतिक सोनवणे (संघप्रमुख), अजय पाटील, प्रतिक लंगोटी, लक्ष्मण बाविस्कर, गिरीष पाटील, कुशल देवरे तर इलेक्ट्रिकल बेस कारच्या संघात सोहिल दोषी (संघप्रमुख), प्रवीण पाटील, शिवधन भांगर, शुभम सुगंधी व वैभव पवार या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.