Coronavirus: प्रवासी मजुरांसाठी कोणत्याही जिल्ह्यांतून श्रमिक एक्सप्रेस चालवण्यास तयार, रेल्वेची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:52 AM2020-05-17T08:52:23+5:302020-05-17T09:02:36+5:30
जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. कोणत्याही जिल्ह्यातून रेल्वे विशेष गाड्या चालविण्यास तयार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या यादीसह राज्य नोडल अधिका-यांमार्फत अर्ज करावा लागणार आहे. गोयल यांनी एका ट्विट करत म्हटले की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागणार आहे.
To provide relief to migrant labour, Indian Railways is ready to run "Shramik Special" trains from any District in the Country. District Collectors should prepare lists of stranded labour & destination and apply to Railways through the State nodal officer.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 16, 2020
डीएमला नोडल ऑफिसरमार्फत अर्ज करावा लागतो
गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास तयार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिका-यांमार्फत कामगारांची यादी व त्यांच्या ठिकाणांच्या तपशिलासह अर्ज करावा लागेल. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यांच्या नोडल अधिका-यांची यादीही जोडली आहे.
Along with this, the District Collectors should give a list and destination to the State Nodal Officer of Railways.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 16, 2020
इसी के साथ डिस्ट्रिक्ट कलैक्टर एक सूची और गंतव्य स्टेशन, रेलवे के स्टेट नोडल ऑफिसर को भी दे दें। pic.twitter.com/haJRDcAp4V
रेल्वे दररोज 300 गाड्या चालवण्यास तयार
रेल्वेमंत्री गेल्या काही दिवसांपासून मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यासाठी राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. विशेषतः राजस्थान, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना त्यांच्याकडे अडकलेल्या प्रवासी मजुरांची माहिती द्यावी अन् नोडल अधिकाऱ्यांमार्फत अडकलेल्या प्रवाशांची नावं द्यावीत, असंही आवाहनही रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 1 मे ते 15 मेदरम्यानच्या मध्यरात्रीपर्यंत देशभरात 1074 कामगार गाड्या चालविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत सुमारे 14 लाख प्रवासी कामगारांना श्रमिक एक्स्प्रेसच्या माध्यमातून घरी पोहोचवण्यात आलं आहे. रेल्वेच्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांत रेल्वेनं 1000हून अधिक कामगार गाड्यांना मान्यता दिली आहे. यातील बहुतांश गाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारदरम्यान धावल्या आहेत. या गाड्यांच्या संचालनात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सहकार्याचे रेल्वेमंत्र्यांनी कौतुक केले आहे.
कोणत्या राज्यात किती गाड्या धावण्यास परवानगी
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत दररोज दोन लाखांहून अधिक कामगारांना त्यांच्या राज्यांत पोहोचवण्यात आलं आहे. ही क्षमता येत्या काही दिवसांत तीन लाखांपर्यंत पोहोचेल. आतापर्यंत धावणा-या कामगार विशेष गाड्यांपैकी 387 गाड्या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये चालवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशने 526 गाड्या चालवण्यास मान्यता दिली आहे. बिहारमध्ये 269 ट्रेन आणि मध्य प्रदेशसाठी 81 गाड्या धावल्या आहेत. तसेच झारखंडसाठी 50, ओडिशासाठी 52 , राजस्थानसाठी 23आणि बंगालसाठी 9 श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात आल्या आहेत.
प्रवाशांना करावं लागणार क्वारंटाइन नियमांचं पालन
राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांनी तिकिट काढण्यापूर्वी क्वारंटाईन नियमांचं पालन करण्यास सहमती दर्शविली पाहिजे. त्यानुसार प्रवाशांनी आपापल्या राज्यात पोहोचल्यावर आवश्यकतेनुसार अलग ठेवण्याचे नियम पाळले पाहिजेत. आयआरसीटीसी अधिका-यांनी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत राजधानी स्पेशलहून बंगळूरहून दिल्लीहून आलेल्या 19 प्रवाशांनी अलगीकरणात जाण्यास नकार दिला होता.