१३०० बचत गटांना १६ कोटींचे वाटप राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान : ७९१ बचतगटांना कर्जाची प्रतिक्षा
By admin | Published: February 22, 2016 12:03 AM2016-02-22T00:03:48+5:302016-02-22T00:03:48+5:30
जळगाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
Next
ज गाव : राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत या वर्षभरात दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रोजगारक्षम बनविण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर ७९१ बचतगट कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात करण्याच्या निर्णयानुसार राज्यात १८ जुलै २०११ पासून स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानात रुपांतर झाले आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देशवंचित दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वयंरोजगारीची क्षमता वाढविणे, स्वयंरोजगारींना लाभदायक क्षमतावृध्दी, स्वयंरोजगार व कौशल्यावर आधारित रोजगाराची संधी उपलब्ध करुन स्वरोजगारीचे कायम स्वरुपी उत्पन्न वाढवुन त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणने हा मुख्य उद्देश आहे.२६ कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिट्ययोजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हजार १०१ बचत गटांना २६ कोटी २५ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आहे. मात्र जिल्हाभरातील दोन हजार १२० बचत गटांनी तब्बल २९ कोटी २२ लाखांचे कर्जप्रकरणे विविध बँकांमध्ये सादर केले आहेत.१४७१ बचतगटांचे प्रकरणे मंजूरया योजनेतंर्गत बचत गटांतर्फे सादर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांपैकी एक हजार ४७१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात या बचत गटांना १८ कोटी ५४ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली. जानेवारी महिन्यापर्यंत त्यातील १३०० प्रकरणांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.इन्फो-२९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारलेया योजनेतंर्गत दाखल केलेल्या २९ बचत गटांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. या बचत गटांनी ४३ लाख ७० हजार रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यात जळगाव, मुक्ताईनगर व रावेर या तालुक्यांमधील बचत गटांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ जामनेर व पाचोरा या तालुक्यातील बचत गटांचे कर्जप्रकरणे नाकारण्यात आले आहेत.