‘राष्ट्रीय स्वयंरोजगार’ महाराष्ट्र द्वितीय

By Admin | Published: June 8, 2017 06:17 AM2017-06-08T06:17:53+5:302017-06-08T06:17:53+5:30

स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे राबवल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

'National Self Employment' Maharashtra II | ‘राष्ट्रीय स्वयंरोजगार’ महाराष्ट्र द्वितीय

‘राष्ट्रीय स्वयंरोजगार’ महाराष्ट्र द्वितीय

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाा (रेसेटस्) च्या अभियानात बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे राबवल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराजमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नत्ती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रादेशिक संचालक सुनिल कस्तुरे, पोतदार व ग्रामीण उन्नत्ती अभियानाचे संचालक जॉर्ज बर्नाड शॉ उपस्थित होते.
महाराष्ट्रात ‘रेसेटस’्च्या अभियानात २0१६/१७ साली एकूण ८४२ स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात ३६,३१३ बेरोजगारांना प्रशिक्षित करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी २0१४/१५ साली ९0९२, २0१५/१६ साली १२,२१३ बेरोजगारांना याच कार्यक्रमानुसार राज्यात स्वयंरोजगार प्राप्त झाले.

Web Title: 'National Self Employment' Maharashtra II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.