राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:38+5:302016-02-23T00:03:38+5:30
हॅलो १ साठी...
ह लो १ साठी...जळगाव- जागतिक मुद्रण दिनानिमित्त केसीई संस्थेच्या मल्टीमीडिया विभागातर्फे २४ रोजी सकाळी ९.३० वाजता मुद्रकांसाठी सेमीनार, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील मुद्रकांत आमंत्रीत करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजक प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपट गृहांना बिकट दिवसजळगाव- मराठी चित्रपटांना कर माफी व निर्मात्यांना सवलती दिल्या जातात. परंतु चित्रपट गृहांना सवलती नसतात. ही बाब अयोग्य असल्याचे जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघाचे महेंद्र लुंकड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एक पडदा चित्रपट गृह संघटनेतर्फे शासनाकडे विविध मागण्या केल्या. त्यात करमणूक कर माफ करा, सवलती द्या आदी मागण्या केल्या, पण त्यांची दखल घेतली नाही. आता व्यवसाय करणे तोट्याचे, अडचणीचे आहे. जिल्ह्यात ३० एक पडदा चित्रपट गृह बंद झाले झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सफाई अभियानजळगाव- संत निरंकारी मंडळातर्फे २३ रोजी सकाळी ७.३० वाजेपासून सफाई अभियान शहरात राबविले जाणार आहे. रेल्वे स्टेशन भागात ही मोहीम अधिक तीव्र असेल. तसेच मंडळाच्या शिरसोली रोडवरील नवनिर्मित भवन परिसर स्वच्छ केला जाईल. तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता संत निरंकारी भवन, शिरसोली रोड येथे सत्संग होईल, असे राजकुमार वाणी यांनी कळविले आहे. वर्ल्ड सायन्स डेजळगाव- वर्ल्ड सायन्स डेनिमित्त वर्धमान अकॅडमीतर्फे २८ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर केले जातील, असे कळविण्यात आलेे आहे. व्याख्यानजळगाव- जिल्हा वकील संघातर्फे तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. डॉ.शालीग्राम भंडारी यांनी व्याख्यान दिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी अध्यक्षस्थानी होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश पटनी, वकील संघाचे सचिव ॲड.गोविंद तिवारी, उपाध्यक्ष स्वाती निकम, सहसचिव रुपाली भोकरीकर, कोषाध्यक्ष राहुल झवर, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भरती मेळावाजळगाव- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मेस हॉलमध्ये २५ रोजी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सुरुवात होईल. जिल्ह्यातील अनेक नामांकीत आस्थापनांशी संबंधीत अधिकारी उपस्थित राहतील, असे कळविण्यात आले आहे.