झुंडशाही करणारे राष्ट्रवादी कसे- नायडूंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:33 AM2018-09-10T04:33:54+5:302018-09-10T04:34:29+5:30
जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे.
नवी दिल्ली : जमावाने केलेल्या हत्यांमध्ये (लिंचिंग) आणि द्वेषाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेले स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकतात, असा प्रश्न उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे. ते मंगळवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशिष्ट समाजासंबंधी किंवा सामाजिक संबंधांविषयीच्या समाजाच्या वर्तनात बदल होणे गरजेचे आहे.
‘तुम्ही जेव्हा दुसऱ्या माणसाला मारता, तेव्हा तुम्ही स्वत:ला राष्ट्रवादी कसे म्हणवून घेऊ शकता? म्हणून विशिष्ट समाजासंबंधीच्या वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. धर्म, जात, कातडीचा रंग किंवा लिंग याच्या आधारे तुम्ही भेदभाव करता. राष्ट्रवाद, भारत माता की जय यांना फार व्यापक अर्थ आहे. लिंचिंगसारख्या घटनांचे राजकारण केले जाऊ नये किंवा त्यांना राजकीय पक्षाशी जोडू नये,’ असे नायडू यांनी सांगितले.