विद्यार्थ्यांनी तयार केले नैसर्गिक रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 12:05 AM2016-03-13T00:05:40+5:302016-03-13T00:05:40+5:30
(फोटो आहे)
Next
(फ ोटो आहे)जळगाव : पाण्याची नासाडी व प्रदुषण टाळण्यासाठी शळकरी मुलांमध्ये जागृती व्हावी व रासायनिक रंगांऐवजी नैसर्गीक रंग वापरुन पर्यावरण पुरक होळी साजरी होण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागातर्फे स्मृती उद्यानात खेलो होली इको फ्रेंडली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सरकारी वकील स्वाती निकम, सामाजिक वनीकरणचे सहाय्यक संचालक एम. एन. खैरनार लागवड अधिकारी मधुकर नेमाडे उपस्थित होते.यावेळी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाची शपथ देण्यात आली. तसेत झाडांची पाणे, फुले, फळे, कंद , फळ भाज्या पासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण खुबचंद सामरमल विद्यालयाचे ट्रेनर प्रविण पाटील, विभागगीय सर्वेक्षक सुभाष इंगळे यांनी दिले. कार्यक्रमासाठी सतिष पाटील, जुलेखा शेख, आशिफ पठाण, असिम पिंजारी, संदिप नेहते, श्रीकांत तायडे यांनी सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी लागवड अधिकारी पी. आर. तेली, एम.पी. नांदेडक, सुरेश सोनवणे, काशीनाथ सोनार यांनी परिश्रम घेतले.