नौदलाची ताकत वाढणार, 10 सप्टेंबरला लॉन्च होणार पहिली मिसाइल ट्रॅकिंग युद्धनौका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:19 IST2021-09-06T13:18:09+5:302021-09-06T13:19:20+5:30
ही स्वदेशी आयएनएस ध्रुव युद्धनौका शत्रूची क्षेपणास्त्रे, पाणबुड्या आणि उपग्रहांचे अचूक स्थान सांगण्यास सक्षम आहे.

नौदलाची ताकत वाढणार, 10 सप्टेंबरला लॉन्च होणार पहिली मिसाइल ट्रॅकिंग युद्धनौका
नवी दिल्ली: आता समुद्रात भारताची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदल 10 सप्टेंबर रोजी देशातील पहिले क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज लॉन्च करणार आहे. INS ध्रुव असे या जहाजाचे नाव असून, ही युद्धनौका हवेत असलेल्या शत्रूच्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा शोध घेऊन नष्ट करण्यास सक्षम आहे. याद्वारे अणू आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही सहज ओळखता येतील. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये याचे प्रक्षेपण होणार आहे.
पहिले क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज लॉन्च केल्यानंतर भारत हे तंत्रज्ञान असणारा पाचवा देश बनेल. आतापर्यंत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीनकडे अशा युद्धनौका आहेत. हिंदुस्थान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही युद्धनौका तयार केली आहे. 2014 मध्ये याला बनवण्याचे काम सुरू होते. 2018 मध्ये ते पूर्णपणे पूर्ण झाले. यानंतर 2018 पासून समुद्रात याची चाचणी सुरू करण्यात आली होती.
https://t.co/IusuRQiwNA
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
तालिबानने शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी दिली आहे. पण, एक मोठी नियमावली जारी केली आहे.#Afghanistan#taliban
आयएनएस ध्रुव समुद्रसपाटीचे मॅपिंग करण्यास सक्षम असून, याद्वारे सागरी संशोधनाबरोबरच शत्रूच्या पाणबुड्याही शोधता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमानादेखील या जहाज प्रक्षेपण समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
10 हजार टन वजनाचे INS ध्रुव रडार तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक 'इलेक्ट्रॉनिक स्कॅन अॅरे रडार' तंत्रज्ञानाने सज्ज आहे. याद्वारे शत्रूचे उपग्रह, क्षेपणास्त्र क्षमता आणि लक्ष्यापासून त्याचे अंतर यासारख्या गोष्टी सहज शोधता येतात. ध्रुव अणू क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही सहज ओळखू शकेल. या युद्धनौकेच्या माध्यमातून 2 हजार किमीपर्यंत पाळत ठेवली जाऊ शकते.
https://t.co/2PN07IBPMo
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.#ChitraWagh#ncp#bjp
हे जहाज शत्रूची क्षेपणास्त्रे, पाणबुड्या आणि उपग्रहांचे अचूक स्थान सांगण्यास सक्षम आहे. यात एक्स-बँड रडार बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या निगराणीसाठी याचा उपयोग होतो. याद्वारे, उच्च रिझोल्यूशनवर टार्गेट पाहणे, जामिंग टाळणे आणि लांब अंतरासाठी स्कॅन करणे शक्य आहे. चेतक सारखी मल्टीरोल हेलिकॉप्टर देखील INS ध्रुववरुन उड्डाण घेऊ शकेल.