नेव्हल वॉर रूम लिकप्रकरणी दिल्ली न्यायालयात सुनावणी सुरू
By admin | Published: September 9, 2014 04:10 AM2014-09-09T04:10:52+5:302014-09-09T04:10:52+5:30
२00६ नेव्हल वॉर रूम लिक प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयात सुरुवात झाली.
नवी दिल्ली : २00६ नेव्हल वॉर रूम लिक प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयात सुरुवात झाली.
या प्रकरणात तीन माजी नौदल अधिकारी आणि हवाई दलाच्या एका विंग कमांडरसह पाच जणांचा समावेश आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश जेपीएस मलिक यांनी इन कॅमेरा सुनावणीला सुरुवात केली. न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराचे बयान नोंदवले. सरकारी साक्षीदाराची साक्ष उद्यादेखील नोंदविण्यात येणार आहे.
माजी नौदल अधिकारी कुलभूषण प्रशार, माजी नौदल कमांडर विजेंद्र राणा, बडतर्फ नौदल कमांडर व्ही.के. झा, हवाई दलाचे माजी विंग कमांडर सांभा जी. एल. सुर्वे आणि शस्त्रास्त्र व्यावसायिक आणि दिल्लीतील व्यावसायिक अभिषेक वर्मा यांच्याविरुद्ध या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. (वृत्तसंस्था)