अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 10:44 AM2018-04-21T10:44:51+5:302018-04-21T11:06:46+5:30

नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला आहे. 

Navi Mumbai Commissioner has rejected parole application of 1993 Mumbai blasts case convict Abu Salem | अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा

अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला, निकाहसाठी 45 दिवसांची मागितली होती रजा

Next

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला आहे. निकाहसाठी अबू सालेनमनं तळोजा कारागृह प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, अर्ज फेटाळण्यात आला आहे. कौसर बहार नावाच्या नव्या प्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी त्यानं अर्ज केला होता, अशी माहिती समोर आली आहे. कौसर बहार आणि अबू सालेम यांच्या निकाहसाठी 5 मे ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  

नवी मुंबईतील तळोजा कारागृहात सध्या तो शिक्षा भोगतो आहे. मुंबईतील 93च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरू आहेत. 1993च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 



 

Web Title: Navi Mumbai Commissioner has rejected parole application of 1993 Mumbai blasts case convict Abu Salem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.