नवी मुंबई, इंदूर कचरामुक्तीत आघाडीवर; शहरी विकास मंत्रालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:08 AM2020-05-20T01:08:40+5:302020-05-20T01:09:24+5:30
अंबिकापूर, इंदूर, राजकोट, सुरत, म्हैसूर आणि नवी मुंबई या शहरांचा फाइव्ह स्टारमध्ये समावेश आहे.
नवी दिल्ली : सरकारने मंगळवारी कचरा व्यवस्थापनाबाबतची आपली रेटिंग जारी केली. सहा शहरांना फाइव्ह स्टार कचरा मुक्तीचा टॅग देण्यात आला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांची घोषणा केली. अंबिकापूर, इंदूर, राजकोट, सुरत, म्हैसूर आणि नवी मुंबई या शहरांचा फाइव्ह स्टारमध्ये समावेश आहे.
एकूण १४१ शहरांना क्रमवारी देण्यात आली आहे. यातील सहा फाइव्ह स्टार, ६५ थ्री स्टार आणि ७० वन स्टार आहेत. नवी दिल्ली, हरयाणातील कर्नाल, आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा, चंदीगड, छत्तीसगडमधील भिलाई नगर, गुजरातमधील अहमदाबाद, मध्यप्रदेशातील भोपाळ आणि झारखंडमधील जमशेदपूर यांचा थ्री स्टारमध्ये समावेश आहे. वन स्टार रेटिंगमध्ये दिल्ली कॅन्टोनमेंट, रोहटक, ग्वाल्हेर, महेश्वर, खंडवा, भावनगर, हाथोद हे मध्यप्रदेशातील शहरे आणि गुजरातमधील बडोदा आणि भावनगर, व्यारा यांचा समावेश वन स्टारमध्ये आहे. १४३५ शहरांनी स्टार रेटिंगसाठी अर्ज केले होते.
पुरी यांनी सांगितले की, स्वच्छता आणि कचरामुक्तीचे व्यवस्थापन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे आणण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत अनेक कामे सुरु केली. शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले की, पुरी यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सरकारने लाखो शौचालयांची उभारणी केली.
जालन्यासह महाराष्टÑातील ३४ शहरांचा समावेश
- थ्री स्टार शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ३४ शहरांना स्थान मिळाले असून त्यात चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे, मीरा-भार्इंदर आदींचा समावेश आहे, तर ४१ शहरांना वन स्टारचे रेटिंग मिळाले. त्यात अहमदनगर, अकोला, नाशिक वसई-विरार आणि कल्याण- डोंबिवली आदींचा समावेश आहे.