स्वच्छतेत नवी मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप; राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:10 AM2022-10-02T06:10:40+5:302022-10-02T06:11:05+5:30
मध्य प्रदेशातील इंदूरने यावर्षी सलग सहाव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहर होण्याचा मान पटकावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूरने यावर्षी सलग सहाव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहर होण्याचा मान पटकावला. गुजरातमधील सुरत शहराने दुसरा क्रमांक अबाधित ठेवला, तर एका अंकाने प्रगती करत महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरे स्थान मिळवले. केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणाचे निष्कर्ष शनिवारी घोषित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांत पहिला क्रमांक मध्य प्रदेशने पटकावला असून, त्यानंतर छत्तीसगड (दुसरा क्रमांक) व महाराष्ट्राला (तिसरा क्रमांक) स्थान मिळाले आहे. इंदूर, सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या गटातील आपले अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम ठेवले.
पाचगणी, कऱ्हाडचा झेंडा
एक लाखाहून कमी लोकसंख्या गटात पाचगणीने पहिला व कऱ्हाडला तिसरा क्रमांक मिळाला.
देवळाली छावणी परिषद अव्वल
सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ छावणी परिसर म्हणून महाराष्ट्रातील देवळाली छावणी परिषदेची निवड करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"