नवज्योतसिंग सिद्धू यांची नवी इनिंग्ज काँग्रेससोबत?

By admin | Published: October 15, 2016 02:01 AM2016-10-15T02:01:19+5:302016-10-15T02:01:19+5:30

भाजपाच्या खासदारकीसह सर्व पदांचे राजीनामे देऊन बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते आणि भारतीय क्रिकेट संघातील सलामीचे फलंदाज नवज्योतसिंग सिद्धू

Navinjyot Singh Sidhu's new inning with Congress? | नवज्योतसिंग सिद्धू यांची नवी इनिंग्ज काँग्रेससोबत?

नवज्योतसिंग सिद्धू यांची नवी इनिंग्ज काँग्रेससोबत?

Next

चंदीगड : भाजपाच्या खासदारकीसह सर्व पदांचे राजीनामे देऊन बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते आणि भारतीय क्रिकेट संघातील सलामीचे फलंदाज नवज्योतसिंग सिद्धू आता काँग्रेसच्या टीममधून नवी इनिंंग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागावाटपातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सिद्धू यांच्या आवाज -ए-पंजाब या संघटनेकडून आणि काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यानंतर सिद्धू यांची काँग्रेससोबत नवी इनिंग सुरू होईल, असे सांगितले जात आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू आणि काँग्रेसमधील हे नवे समीकरणे
आता आकार घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू यांना विधानसभा निवडणुकीसाठी २५ ते ३१ जागा हव्या आहेत. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी दिल्लीत तशी मागणीही केली. तर, काँग्रेस त्यांना ७ ते १३ जागांसाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Navinjyot Singh Sidhu's new inning with Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.