जुन्या योजनांची थकबाकी वसुली टप्प्याटप्प्याने नवसंजीवनी योजना : ५३ गावांच्या पाणी योजनांची थकबाकी भरण्याविषयी चर्चा

By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:34+5:302016-03-29T00:24:34+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या जिल्हाभरातील ५३ गावांमधील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी चार कोटी ४० लाख ९६ हजार ३०३ रुपये एवढी असल्याने यामध्ये नवसंजीवनी योजनेतून सवलत मिळण्यासंदर्भात २८ मार्च रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांची वीज कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. ही थकबाकी कशी वसूल करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.

Navjanjivani Yojna: Outstanding 53 schemes for the payment of outstanding water schemes | जुन्या योजनांची थकबाकी वसुली टप्प्याटप्प्याने नवसंजीवनी योजना : ५३ गावांच्या पाणी योजनांची थकबाकी भरण्याविषयी चर्चा

जुन्या योजनांची थकबाकी वसुली टप्प्याटप्प्याने नवसंजीवनी योजना : ५३ गावांच्या पाणी योजनांची थकबाकी भरण्याविषयी चर्चा

Next
गाव : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या जिल्हाभरातील ५३ गावांमधील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी चार कोटी ४० लाख ९६ हजार ३०३ रुपये एवढी असल्याने यामध्ये नवसंजीवनी योजनेतून सवलत मिळण्यासंदर्भात २८ मार्च रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांची वीज कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. ही थकबाकी कशी वसूल करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.
जुन्या पाणी योजनांच्या थकबाकीमुळे संबंधित गावांमधील नवीन योजनांना वीज जोडणी मिळत नसल्याचे थकबाकी भरण्यासाठी जि.प.तील वरिष्ठ अधिकार्‍यांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. त्यात नवसंजीवनी योजनेतून थकबाकी भरण्याचा मार्ग निघाला. या योजनेतून थकबाकीवरील दंड व व्याज माफ होईल. निव्वळ थकबाकीच्या रकमेतील ५० टक्के रक्कम शासन भरेल व उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रा.पं.ला १० हप्त्यांमध्ये भरता येईल. १० हप्त्यांमधील पहिले दोन हप्ते एकाच वेळी भरायचे आहेत. त्यानंतर वीज जोडणी मिळणार आहे.
त्यानुसार सोमवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांची वीज कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. त्यात नवसंजीवनी योजनेतून सवलत मिळाल्यानंतर थकबाकीचा आकडा किती आहे, तो आल्यानतर टप्प्या-टप्प्याने ही रक्कम वसूल केली जाईल, असा सूर बैठकीत उमटला.
नवीन योजना तयार झाल्या आहेत, परंतु त्यांचा वापर होत नसल्याने ग्रामस्थांसह पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे. यामुळे जि.प.कडे तक्रारी येत आहे.

पाणी योजनांची थकबाकी...
बोदवड- कोल्हाडी २६५५४४, मुक्तळ ८६९८२, निमखेड १२७२३०, राजूर २०८०५४, वराड बुद्रूक ८१६७३६, गोळेगाव बुद्रूक २४५६३. जामनेर- डोहारी १३०८४०९, नागण खुर्द २२०४६९, नवीदाभाडी ३६७८२४, कापूसवाडी ३७४२५१, वडगाव तिघरे २९२४२७, खडकी ३३४२६३, लोणी २३०२२०, मालदाभाडी ४१७८७९, मोयखेडा दिगर ८९५५८५, मुंदखेडा ८७११७२, टाकरखेडा ३५७२५१, पाटखेडा ८१९०४, शहापूर ४३२२६६, सारगाव १६७१३९, वसंतनगर २२०४४०, वाकी ३५४०४, वाघारी ६४०७७२, भराडी ४१५९५४, भारूडखेडा ३३००२०, देवपींप्री १८९९९६४, हिंगणे बुद्रूक ३१८८५५, मांडवा बुद्रूक ३३०३९५, वडगाव ३१६५६. मुक्ताईनगर- चिंचखेडा बुद्रूक ९१४८४७, डोलारखेडा ८३०२०६, थेरोळा ९९९८४५, मेळसांगवे १४०५९४९, वायला ७२५९८९, पिंप्रीनांदू ६४९८५९, शेमळदे १११३०३३. यावल- आमोदा २८३४७७, न्हावी प्र.अडावद ३१७२०७, विरोदा ८३७८००, किनगाव बुद्रूक १६२६२४०, किनगाव खुर्द ७८०५८२९, करंजी ४५४१३, पथराडे १०३३८५७, वाघझिरा १९५९५४५, वढोदा १४०५००१.

Web Title: Navjanjivani Yojna: Outstanding 53 schemes for the payment of outstanding water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.