'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', तर 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल''

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:28 AM2019-03-13T11:28:13+5:302019-03-13T11:28:35+5:30

काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

navjot singh sidhu congress leader navjot singh sidhu attacks on bjp and pm modi | 'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', तर 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल''

'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', तर 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल''

googlenewsNext

नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवासी झालेले सिद्धू भाजपा सरकारविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे भाजपाची सोशल मीडिया टीम त्यांना ट्रोल करत असते.

नवज्योत सिंग सिद्धू ट्विटमध्ये म्हणतात, कोणताही घोटाळेबाज तुरुंगात गेला नाही. कोणाकडेही काळा पैसा सापडला नाही. गंगा स्वच्छ झाली नाही. सीमेवर शहिदांची संख्या कमी झालेली नाही. मोदी सरकार हे फक्त मोबाइलला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बनवण्यात आलं आहे काय ?, असा सवालही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी एप्रिल फूल, तर पाच वर्षं मूर्ख बनवण्यासाठी कमळाचं फूल, असं म्हणत त्यांनी भाजपावर उपरोधिक टीका केली आहे.


तर गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधल्या संत कबीरनगरमध्ये भाजपा खासदार-आमदारांमध्ये झालेल्या खडाजंगीचा हवाला देत सिद्धू यांनी मोदींवरही निशाणा साधला होता. एक व्हिडीओ प्रसिद्ध करत ते म्हणाले होते, मोदीजींची विनम्रता आणि विवेकाची परिभाषा, हीच आहे का देशाची आशा?, लोकतंत्राच्या पहिलेच ट्रोलतंत्र, लाठीतंत्र, भयतंत्र पाहिलं होतं. आता खासदार महोदयांनी बूटतंत्रही आणलं आहे. बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान-अल्लाह, असंही म्हणत सिद्धू यांनी भाजपावर टीका केली होती.

 

Web Title: navjot singh sidhu congress leader navjot singh sidhu attacks on bjp and pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.