'शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 मिनिटांत अस्वस्थ झाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:24 PM2022-01-06T17:24:24+5:302022-01-06T17:24:33+5:30
Navjot Singh Sidhu: पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, “शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ धरणे धरून बसले होते, परंतु काल जेव्हा पंतप्रधानांना सुमारे 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले.
चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. भटिंडा विमानतळावरgन रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती. त्यामुळे पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.
#WATCH Farmers sat on protest at Delhi borders for over a year,but yesterday when PM had to wait for around 15 mins he was troubled by it. Why these double standards? Modi Ji, you had said that you'll double farmers' income but you even took away what they had: Navjot Sidhu, Cong pic.twitter.com/qtflt4WmOI
— ANI (@ANI) January 6, 2022
आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल जेव्हा पंतप्रधानांना फक्त 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल सिद्धूंनी केला. तसेच, मोदीजी, तुम्ही शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते, पण त्यांच्याकडे जे होते तेही तुम्ही काढून घेतले, अशी टीकाही केली.
'जिवंत आलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'
उड्डाणपुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे बुधवारी पंतप्रधानांचा ताफा रॅलीच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. यानंतर पंतप्रधानांनी आपली सभा रद्द करुन भटिंडा विमानतळावर परतले. भटिंडा विमानतळावर परत येताना मोदी तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणाले, "भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार." दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील 'गंभीर त्रुटी' असल्याचे म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने अहवाल मागवला
गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने पंजाबच्या दौऱ्यादरम्यान गंभीर सुरक्षा उल्लंघनानंतर परतण्याचा निर्णय घेतला. निवेदनात मंत्रालयाने पंजाब सरकारला या त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्यास आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान भटिंडाहून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना ही घटना घडली.