Navneet Rana: रामदास आठवलेंनी घेतली राणा दाम्पत्याची भेट, दिलं महत्त्वाचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:28 PM2022-05-10T23:28:29+5:302022-05-10T23:49:43+5:30

लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला

Navneet Rana: Ramdas Athavale met Rana couple, gave an important promise | Navneet Rana: रामदास आठवलेंनी घेतली राणा दाम्पत्याची भेट, दिलं महत्त्वाचं आश्वासन

Navneet Rana: रामदास आठवलेंनी घेतली राणा दाम्पत्याची भेट, दिलं महत्त्वाचं आश्वासन

Next

नवी दिल्ली - अमरावतीच्या खासदार आणि मातोश्रीबाहेर आंदोलन करत हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरलेल्या नवनीत राणा ह्या तुरुंगातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. या रुग्णालयातील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर, थेट दिल्ली गाठत राणा दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. तर, आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी राणा दाम्पत्यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.    

लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यावेळी, अटकेपासून लॉकअपपर्यंत आणि सुटकेपासून रुग्णालायतून घरी पोहोचेपर्यंत घडलेल्या प्रसंगाची इतंभू माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिल्याचे नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या तक्रारीची दखल घेत माझी संपूर्ण बाजू मांडण्यासाठी मला 23 तारीख देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राणा यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, रामदास आठवले यांनी राणा दाम्पत्याच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी, नवनीत राणा यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. तसेच, अन्यायाविरुद्धच्या लढ्यात, न्यायासाठीच्या संघर्षात रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत असेल, अशी ग्वाहीही आठवलेंनी नवनीत राणा यांना दिली. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

१८ दिवसानंतर आई-वडिलांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना १४ दिवस कारागृहात राहावे लागले. या काळात त्यांची मुले ही अमरावती येथील ’गंगा-सावित्री’निवावस्थानीच होते. अखेर मुलगी आरोही आणि मुलगा रणवीर हे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही मुलांनी दिल्लीत जाऊन आई-वडिलांची भेट घेतली. 

Web Title: Navneet Rana: Ramdas Athavale met Rana couple, gave an important promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.