आई राजा उदो उदो... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:06 AM2020-10-17T08:06:12+5:302020-10-17T08:07:36+5:30

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही.

Navratri Festival ... Happy Navratri to the people of the country from Prime Minister Narendra Modi | आई राजा उदो उदो... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा

आई राजा उदो उदो... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा

Next
ठळक मुद्देराज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. शनिवारी (१७ ऑक्टोबर) राज्यातील विविध चतु:शृंगी मंदिर, सप्तश्रृंगी, भवानी माता, महालक्ष्मी मंदिरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सकाळी ७ ते ९ दरम्यान पूजा, अभिषेक आणि घटस्थापना असे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात पुढील नऊ दिवस विविध मंडळांतर्फे आरोग्याचा जागर होत आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशवासीयांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

देशभरातच यंदाचा नवरात्री उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. तर, राज्यातील प्रमुख देवस्थान मंदिरातही यंदा गर्दी टाळूनच नवरात्री उत्सावाला परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नवरात्री उत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, यंदा या मंदिरानेही भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली असून भक्तांना ऑनलाईन दर्शन घेण्याचं बजावलं आहे. 

देवीची 9 रुपे

प्रथम शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चंद्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।।

देवीच्या नऊ रूपांची नावे वरील श्लोकात दिली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला, त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. काय आहे
 

Web Title: Navratri Festival ... Happy Navratri to the people of the country from Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.