नवरात्री स्पेशल,'डॉमिनोज'मध्ये आता फक्त व्हेज पिझ्झा

By admin | Published: September 12, 2016 11:50 AM2016-09-12T11:50:52+5:302016-09-12T12:37:35+5:30

पुढील महिन्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवासाठी डॉमिनोजने खास तयारी केली आहे. शाकाहारी खवय्यांना आकर्षीत कऱण्यासाठी डॉमिनोज व्हेज पिझ्झा देण्याची तयार करत आहे.

Navratri Special, 'Domino' now only takes a whiz pizzas | नवरात्री स्पेशल,'डॉमिनोज'मध्ये आता फक्त व्हेज पिझ्झा

नवरात्री स्पेशल,'डॉमिनोज'मध्ये आता फक्त व्हेज पिझ्झा

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.१२ - लवकरच येणारा 'नवरात्रौत्सव' लक्षात घेऊन 'डॉमिनोज' या आंतरराष्ट्रीय पिझ्झा कंपनीने आपल्या ५०० आऊटलेट्समध्ये केवळ 'शाकाहारी' पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. नवरात्रीच्या काळात अधिकाधिक शाकाहारी खवय्यांना आकर्षीत कऱण्यासाठी डॉमिनोजने ही योजना आणली आहे. त्यामुळे देशभरातील निवडक ५०० आऊटलेट्समध्ये नवरात्रीचे नऊ दिवस फक्त शाकाहारी पिझ्झा सर्व्ह करण्यात येईल. 

येत्या १ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार असून त्या काळात उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील काही शहरातील 500 आउटलेट्समध्ये मांसाहारी पिझ्झा मिळणार नाही. नवरात्रीत अनेकांचा उपवास असतो, तेव्हा ग्राहक मांसाहाराचे सेवन करत नाहीत, हेच ध्यानात ठेऊन ही योजना आखण्यात आली आहे. त्याचसोबत पिझ्झा बेसही वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. 

 
नवरात्रीतील खास मेन्यू-
या दरम्यान केवळ शिंगाडाच्या पिठाचा वापर करूनच पिझ्झा बनवण्यात येणार आहे. कांदा, लसूण, आलं आदी गोष्टींचाही यामध्ये वापर करण्यात येणार नाही . केवळ साबुदाणा आणि मीठाचाच वापर करण्यात येणार आहे. 
 
याबद्दल माहिती देताना, डॉमिनोज पिझ्झा इंडियाचे प्रमुख देव अमृतेश म्हणाले, 'नवरात्री दरम्यान मांसाहारी खाण्याची मागणी कमी असते. त्यामुळे आम्ही ग्राहकांसाठी खास तयारी केली आहे. पिझ्झामध्ये अनेक बदल करणं शक्य आहे त्यानुसारच आम्ही हे बदल केले आहेत. यापtर्वीही डॉमिनोजने व्हेज पिझ्झाचा प्रयोग केला होता मात्र तो तुरळक आउटलेट्समध्ये करण्यात आला होता' असे त्यांनी सांगितले.   
 
या नवीन बदलामुळे जास्त ऑर्डर मिळतील व विक्रा वाढेल अशी डॉमिनोजची अपेक्षा आहे. त्यामुळे डॉमिनोजचा हा बदल भारतीय खवय्यांना किती पचतो ते आता पाहायचे आहे.  

Web Title: Navratri Special, 'Domino' now only takes a whiz pizzas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.