नवरात्रीचे नऊ दिवस नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:58 AM2017-09-21T08:58:00+5:302017-09-21T09:03:38+5:30

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत

Navratri's nine days Narendra Modi and Yogi Adityanath fast | नवरात्रीचे नऊ दिवस नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा उपवास

नवरात्रीचे नऊ दिवस नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा उपवास

googlenewsNext
ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत.नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात फक्त पाणीच पितात.

नवी दिल्ली, दि. 21- आजपासून देशभरात नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी सकाळपासूनच घरोघरी घटस्थापना केली जाते आहे तसंच मंडळांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवीच्या मुर्तीची स्थापना केली जाते आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस सगळ्यांसाठीच महत्त्वाचे असतात. या नऊ दिवसात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने देवीची पूजा करतो. विशेष म्हणजे या नऊ दिवसांमध्ये अनेकजण प्रथेप्रमाणे उपवास करतात. आजपासून त्या उपवासालाही सुरूवात झाली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा देवीच्या उपासनेसाठी नऊ दिवस उपवास करणार आहेत. आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव २९ सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जाईल. 

नरेंद्र मोदी हे गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात फक्त पाणीच पितात. इतके कडक उपवास मोदी करत असल्याची माहिती मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही. याशिवाय, दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. याशिवाय, गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करणार आहेत.

नवरात्रीत नऊ दिवस उपवास करायची प्रथा
नवरात्राच्या नऊ दिवसांत उपवास करतात. उपवास केल्याने शरीरातील मांद्य निघून जाते. शरीर हलके बनते. त्यामुळे पूजा-उपासना करताना मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. आत्मशद्धीसाठी उपवास केला जातो. चित्त शुद्ध होते. मनात वाईट विचार येत नाहीत. काही उपासक नवरात्रात हलका आहार घेऊन उपवास करतात. तर काही भाविक केवळ फलाहारच करतात. तर काही एक वेळ जेवण घेतात. काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काही भक्त निर्जळी म्हणजे पाणीही न पिता उपवास करतात. मात्र असे कडक उपवास करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही एक गोष्ट नीट समजून घ्या की उपवास हे अंतिम साध्य नाही. उपवास हे एक साधन आहे. शरीरास अपायकारक होईल असा उपवास करणे योग्य होणार नाही. या नऊ दिवसांत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवावे. त्यामुळे तुमचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढत असतो. कारण कोणत्याही देवतेची पूजा करण्यामागे आपला एकच हेतू असावा तो हा की आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा. आपण व्यसनी, भ्रष्टाचारी, आळशी, अज्ञानी, अंधश्रद्धेने ग्रासलेले असू तर पूजा केल्याने आपण निर्व्यसनी, नीतिमान, उद्योगी, ज्ञानी, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणारे व्हावयास हवे आहे. पूजा केल्याने आपण निर्भय व्हावयास हवे आहे. आपल्यात जर असा चांगला बदल जो आपल्याच हातात आहे तो जर झाला नाही, तर पूजा, उपासना करून काहीही साध्य होणार नाही. हे कलियुग आहे. इथे केवळ देवीची पूजा - उपासना करून काहीही साध्य होणार नाही. आपल्यात चांगला बदल करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. तसे नसते तर रोज मंदिरात देवीची पूजा करणारा पुजारी श्रीमंत झाला असता. त्याला जीवनात कोणताही प्रश्न राहिला नसता. या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.

Web Title: Navratri's nine days Narendra Modi and Yogi Adityanath fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.