...अन् ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आलेला तरुण दगावला; ट्रॅक्टर मार्चदरम्यान मृत्यू

By कुणाल गवाणकर | Published: January 27, 2021 05:05 PM2021-01-27T17:05:18+5:302021-01-27T17:06:06+5:30

मार्चदरम्यान ट्रॅक्टर उलटल्यानं तरुणाचा मृत्यू; एकुलता एक मुलगा गेल्यानं कुटुंबावर शोककळा

navrit came from australia to give marriage reception died during farmers tractor rally | ...अन् ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आलेला तरुण दगावला; ट्रॅक्टर मार्चदरम्यान मृत्यू

...अन् ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आलेला तरुण दगावला; ट्रॅक्टर मार्चदरम्यान मृत्यू

Next

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. या प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च सुरू असताना एक ट्रॅक्टर उलटला. यामध्ये नवरीत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत याआधी दोनदा शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. प्रजासत्ताक दिनी तो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला. मात्र घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. नवरीत आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे

रुद्रपूरच्या जवळ असलेल्या रामपूरच्या डिबडिबा गावात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय नवरीत आधी ऑस्ट्रेलियात राहायचा. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा स्टडी व्हिसा होता. दोन वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात मनशीत कौरसोबत विवाह केला. रिसेप्शन देण्यासाठी तो घरी आला होता. स्टडी व्हिसावर नोकरी केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. नवरीतला भारतात परतून दोन वर्ष झाली होती. तो आणखी वर्षभरानं पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार होता.

शेतकऱ्यांबद्दलचं विधान भोवलं; ६ दिग्गज ब्रँण्ड्सकडून कंगना रणौतसोबतचे करार रद्द

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरीत दोनदा दिल्लीला गेला होता. केंद्रानं मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द केले जावेत, अशी नवरीतची भूमिका होती. याच मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात नवरीत सहभागी झाला. मात्र मार्चदरम्यान नवरीतचा ट्रॅक्टर उलटला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याची माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Web Title: navrit came from australia to give marriage reception died during farmers tractor rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी