15 युद्धनौका अन् 7 पाणबुड्यांद्वारे गार्ड ऑफ ऑनर; नौदल प्रमुखांना अनोख्या शैलीत फेअरवेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:42 PM2024-04-12T21:42:34+5:302024-04-12T21:42:58+5:30
Indian Navy Hindi News: नौदल प्रमुख आर हरी कुमार आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्ष सेवेनंतर 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
Navy Chief Admiral R Hari Kumar: भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार येत्या 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीपूर्वी नौदलाचे विविध विभाग ठिकठिकाणी त्यांच्यासाठी आगळा-वेगळा निरोप कार्यक्रम आयोजित करत आहेत. नौदलाच्या वेस्टर्न कमांडच्या वतीने आज(दि.12) नौदल प्रमुखांना समुद्रात भव्य निरोप देण्यात आला. या 'फेअरवेल'मध्ये नौदलाच्या 15 युद्धनौका आणि 7 पाणबुड्यांद्वारे त्यांना भव्य गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
व्हाइस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी होणार नवीन नौदल प्रमुख
या वर्षी नौदलासह तिन्ही लष्करांना नवीन प्रमुख मिळणार आहेत. ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्या निवृत्तीनंतर नौदलातील सर्वात वरिष्ठ कमांडर व्हाइस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी असतील. त्यांना देशाचे पुढील नौदल प्रमुख बनवले जाईल. सध्या दिनेश त्रिपाठी नौदलाचे उपप्रमुख आहेत.
Navy Chief Admiral R Hari Kumar was given farewell by Western Command at sea where over 15 warships and seven submarines participated. The outgoing Navy chief was also given a guard of honour on the occasion: Indian Navy pic.twitter.com/ngocW2tTX3
— ANI (@ANI) April 12, 2024
आर. हरी कुमार यांचा परिचय
भारताचे 25वे नौदलप्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार केरळचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म तिरुवनंतपुरम येथे झाला. केलळातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतून त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर 1979 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (NDA) परीक्षा उत्तीर्ण करून खडकवासला अकादमीत प्रवेश घेतला. त्यांनी जेएनयूमधून पदवी आणि किंग्ज कॉलेज लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
अनेक युद्धनौकांना कमांड दिली
आर हरी कुमार यांच्या करिअरची सुरुवात जानेवारी 1983 मध्ये नौदलात कमिशनने झाली. आत्तापर्यंत त्यांनी अनेक युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. ते तटरक्षक जहाज C-01, क्षेपणास्त्र नौका INS निशंक, राजपूत श्रेणीची INS रणवीर आणि कोरा वर्ग क्षेपणास्त्र कॉर्व्हेट INS कोराचे कमांडिंग अधिकारी होते.