Navy Day 2022: पाकिस्तानचं कराची बंदर बेचिराख झालं तेव्हा...; भारतीय नौदलाच्या धाडसाची धगधगती कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 10:28 AM2022-12-04T10:28:50+5:302022-12-04T10:36:05+5:30

आज ४ डिसेंबर या दिवशी देशात नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस  १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन ट्रायडंट' या कामगिरीची आठवण म्हणून साजरा केला जातो.

Navy Day 2022 When Pakistan's Karachi port became desolate The fiery story of the bravery of the Indian Navy | Navy Day 2022: पाकिस्तानचं कराची बंदर बेचिराख झालं तेव्हा...; भारतीय नौदलाच्या धाडसाची धगधगती कहाणी!

Navy Day 2022: पाकिस्तानचं कराची बंदर बेचिराख झालं तेव्हा...; भारतीय नौदलाच्या धाडसाची धगधगती कहाणी!

Next

Navy Day 2022: आज ४ डिसेंबर या दिवशी देशात नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस  १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन ट्रायडंट' या कामगिरीची आठवण म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलावर विजय मिळवला होता. यावेळी भारतीय नौदलाने पहिल्यांदाच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. पाकिस्तानचा भारतीय नौदलाने पराभव केला होता. याच दिवसाची आठवण म्हणून ४ डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जातो. 

१९७१ या वर्षी नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट यशस्वी केले होते. या ऑपरेशनमुळेच भारताला पाकिस्तानविरोधात मोठ यश मिळाले होते. 'ऑपरेशन ट्रायडंट' नेमकं काय होते जाणून घेऊ. 

तामिळनाडूत सर्व मंदिरांमध्ये माेबाइल बंदी; हायकोर्टाचे आदेश 

०३ डिसेंबर १९७१ च्या रात्री भारतीय नौदलाचे जहाज मुंबईहून निघाले होते, पण त्यांना कल्पना नव्हती की एक पाकिस्तानी पाणबुडी PNS हँगोर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे थांबली आहे. पाकिस्तानी पाणबुडी हल्ला करण्याच्या तयारीत फिरत होती. यावेळी पाणबुडीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे   समुद्राच्या तळाशी जावे लागले. यावेळी एक पाकिस्तानी पाणबुडी दीवच्या किनाऱ्याभोवती फिरत असल्याचे भारतीय नौदलाच्या लक्षात आले.

त्यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल एसएम नंदा यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन ट्रायडंट'ची योजना तयार करण्यात आली. पाणबुडीविरोधी फ्रिगेट्स INS खुकरी आणि किरपान यांना देशातील समुद्र किनारी फिरणाऱ्या पाकिस्तानी पाणबुडीला नष्ट करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या कामाची जबाबदारी 25 व्या स्क्वाड्रन कमांडर बब्रू भान यादव यांच्याकडे देण्यात आली होती. 4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत भारतीय नौदलाने कराची नौदल तळावरही हल्ला केला. दारूगोळा पुरवठा करणाऱ्या जहाजासह अनेक जहाजे नष्ट झाली. यावेळी पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले होते.

भारतीय नौदलाने त्यावेळी अनेक पाकिस्तानी जहाजे बुडवली होती. आयएनएस विक्रांतच्या डेकवरून लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या कराची बंदर आणि चितगाव आणि खुलना येथील हवाई तळांवर हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराची जहाजे, संरक्षण सुविधा नष्ट करण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आणि विक्रांतच्या हवाई हल्ल्यांमुळे पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याचा कराची बंदरावर पराभव झाला. अनेक दिवस कराची बंदरातील तेलाच्या साठा जळत होता. या लढाईत भारतीय नौदलाची आयएनएस खुकरी देखील बुडाली आणि 18 अधिकार्‍यांसह सुमारे 174 खलाशांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा केला जातो, यावेळी पहिल्यांदाच राजधानीबाहेर नौदल दिन साजरा केला जात आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विशाखापट्टणम या कार्यक्रमाला विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत. नौदल 4 डिसेंबर रोजी 'ऑपरेशनल प्रात्यक्षिक'द्वारे संपूर्ण जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देणार आहे. भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्याही या कार्यक्रमात आपली ताकद दाखवताना दिसणार आहेत. 

Web Title: Navy Day 2022 When Pakistan's Karachi port became desolate The fiery story of the bravery of the Indian Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.