नव-याने दोन्ही पत्नींना कोंडून गाडीला लावली आग, सासूला आनंदात ठेवत नसल्याच्या रागातून केले कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 04:31 PM2017-12-20T16:31:00+5:302017-12-20T17:00:33+5:30
दोन विवाह झालेल्या एका व्यक्तीने दोन्ही पत्नींना गाडीत बंद करुन गाडी पेटवून दिली. दारीया देवी (25) आणि माली देवी (27) या दोन्ही पत्नींना ज्वेलरी विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले.
जालोर - दोन विवाह झालेल्या एका व्यक्तीने दोन्ही पत्नींना गाडीत बंद करुन गाडी पेटवून दिली. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी दीपा रामचे दोन विवाह झाले होते. दीपा रामने दारीया देवी (25) आणि माली देवी (27) या दोन्ही पत्नींना ज्वेलरी विकत घेऊन देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. दारीया देवी आमि माली देवी दोघी आईला आनंदात ठेवत नसल्याने दीपा रामचा त्यांच्यावर राग होता.
त्याच कारणावरुन धावत्या गाडीत त्याने दोघींबरोबर भांडण सुरु केले. वाद इतका वाढला की, गाडीतच त्यांच्यामध्ये हाणामारी सुरु झाली. अखेर दीपा रामने गाडी थांबवताच एका पत्नीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व गाडी बाहेर आली. तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पण दीपा रामने तिला खेचून पुन्हा गाडीत बसवले व गाडी तिथून पळवली.
काही अंतरावर गेल्यानंतर दीपा राम स्वत: गाडीतून उतरला व लगेच त्याने गाडी लॉक केली. दोन्ही पत्नींना गाडीत कोंडल्यानंतर त्याने गाडीला आग लावली. यामध्ये त्याच्या दोन्ही पत्नी भाजल्या आहेत. आरोपी गुजरात येथे नोकरीला असून त्याला तीन मुले आहेत. दीपा रामने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.