लग्नाच्या तीन तास आधी नवरदेवाचा अकाली मृत्यू

By admin | Published: July 14, 2016 12:46 PM2016-07-14T12:46:17+5:302016-07-14T12:49:15+5:30

घरात लग्नसोहळयाची लगबग सरु असताना नवरदेवाचा बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला.

Nawardev's premature death, three hours before marriage | लग्नाच्या तीन तास आधी नवरदेवाचा अकाली मृत्यू

लग्नाच्या तीन तास आधी नवरदेवाचा अकाली मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

मंगळुरु, दि. १४ - घरात लग्नसोहळयाची लगबग सरु असताना नवरदेवाचा बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. मंगळुरुच्या सुलिया तालुक येथे बुधवारी ही दुर्देवी घटना घडली. लग्नाच्या तीन तास आधी ही मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. मृत सचिन गोडा (३२) पेशाने इलेक्ट्रीशियन होता. 
 
घरात नातेवाईक आले होते. लग्नाची लगबग सुरु होती. सचिन दाढी करण्यासाठी म्हणून बाथरुममध्ये गेला असताना पाय घसरुन बाथरुमध्ये पडला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ह्दयविकाराच्या झटक्याने सचिनचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाथरुममध्ये प्रवेश करताच सचिन खाली कोसळला. 
 
बेशुद्धा अवस्थेत असताना नातेवाईक त्याला पुत्तुरच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे दोन कुटुंबातील आनंदाचा सोहळा दु:खामध्ये बदलून गेला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी सचिनच्या शरीरातील नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत.  
 

Web Title: Nawardev's premature death, three hours before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.