पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती

By admin | Published: December 23, 2016 12:00 PM2016-12-23T12:00:18+5:302016-12-23T12:02:57+5:30

पाकिस्तानात भारतीय सिनेमांवरील बंदी काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आली आहे. मात्र आमीर खानचा 'दंगल' सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्याबाबत अजूनही गोंधळ कायम आहे.

Nawaz Sharif's decision in Pak | पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती

पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 -  पाकिस्तानात भारतीय सिनेमांवरील बंदी काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आली आहे. मात्र आमीर खानचा 'दंगल' सिनेमा येथील थिएटरमध्ये दाखवण्याबाबत अजूनही गोंधळ कायम आहे. पाकिस्तानात 'दंगल' सिनेमा प्रदर्शित करायचा कि नाही याबाबतचा निर्णय घेणे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे. आमीर खानचा 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणे न होणे आता शरीफ यांच्या सहमतीवर अबलंबून आहे. त्यामुळे दंगल पाकिस्तानात प्रदर्शित होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे.
(दंगल - मुलींविषयीच्या मानसिकतेवर प्रभावी भाष्य)
पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने सूत्रांच्या हवाल्याने माहिती देत सांगितले आहे की, 'माहिती व प्रसारण मंत्रालय आणि ब्रॉडकास्टिंग अँड नॅशनल हेरिटेजने 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्यासंदर्भात शरीफ यांची परवानगी मागितली आहे.' मात्र नवाज शरीफ परदेश दौ-यावर असल्याने याबाबतचा निर्णय सध्यातरी होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. 
(मी आमीरचा द्वेष करतो - सलमान खान)
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 'जिओ फिल्म' पाकिस्तानात 'दंगल' सिनेमा रिलीज करू शकतो. जिओ फिल्मच पाकिस्तानातील दंगल सिनेमाचा वितरक असून ते आमीर खानच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज शरीफ परदेश दौ-यावरुन परतल्यानंतर 'दंगल' रिलीज करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकेल. 
 
दरम्यान, 'दंगल सिनेमा रिलीज करण्याबाबत नवाज शरीफ यांची प्रतिक्रिया येण्याची वाट पाहत आहोत', अशी माहिती पाकिस्तानातील थिएटर असोसिएशनमधील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. दरम्यान, दंगल सिनेमा देशभरात बॉक्सऑफिसवर झळकला असून सिनेरसिकांचा सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 
 

Web Title: Nawaz Sharif's decision in Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.