बिहार रेल्वेस्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, 2 रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 10:13 AM2017-12-20T10:13:59+5:302017-12-20T10:16:18+5:30
बिहारच्या मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली.
पटना- बिहारच्या मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली. त्यानंतर या नक्षलवाद्यांनी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर आणि एका रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
#Bihar : Naxals attacked Masudan Railway Station, late last night & torched station property. pic.twitter.com/bzMlRbOqwE
— ANI (@ANI) December 20, 2017
मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता नक्षलवाद्यांनी मसूदन रेल्वे स्टेशनवर हल्ला केला. दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण करतानाच रेल्वेच्या सिग्नलिंग पॅनेलसह रेल्वेच्या इतर मालमत्तांना आग लावली. दरम्यान, नक्षलवाद्यांचा हल्ला होताच सहाय्यक स्टेशन मास्तरने त्यांच्या अपहरणापूर्वी मालदा डिआरएमला फोन करून या हल्ल्याची माहिती दिली होती.' मसूदन रेल्वेस्थानकावर ट्रेन आल्यातर नक्षलवादी प्रवाशांना मारतील, असं स्टेशन मास्तरांनी डिआरएमला कळवलं. त्यानंतर लगेचच रेल्वेस्थानकावर अनाऊन्समेंट होऊन या हल्ल्याची प्रवाशांना सूचना देऊन प्रवाशांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं.
#SpotVisuals: Naxals attacked Masudan Railway Station, late last night & torched station property. 2 officials, including Assistant Station Master, abducted. pic.twitter.com/PZ9oNsXPUh
— ANI (@ANI) December 20, 2017
नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर मसूदन रेल्वेस्थानकाकडे येणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला तसंच प्रवाशांमध्येही चिंतेचं वातावरण होतं. काही तासानंतर सिग्नलिंग पॅनेल दुरुस्त केल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली. मसूदनमध्ये नक्षलवाद्यांचं प्रमाण जास्त आहे. मसूदन रेल्वे स्टेशनवर झालेल्या हल्ला पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा आरोप केला जातो आहे. नक्षलवाद्यांकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता गृहित धरून पोलीस आणि सुरक्षा दलाला अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले होते.