नक्षलवाद्यांचा हल्ला; अधिकारी शहीद

By admin | Published: August 23, 2015 03:32 AM2015-08-23T03:32:44+5:302015-08-23T03:32:44+5:30

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या घातपाती हल्ल्यात विशेष कार्यदलाचा एक अधिकारी शहीद, तर एक जवान जखमी झाला.

Naxal attack; Officer martyr | नक्षलवाद्यांचा हल्ला; अधिकारी शहीद

नक्षलवाद्यांचा हल्ला; अधिकारी शहीद

Next

रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर केलेल्या घातपाती हल्ल्यात विशेष कार्यदलाचा एक अधिकारी शहीद, तर एक जवान जखमी झाला.
एसटीएफचे पथक जिल्ह्याच्या दरभा भागात मोहिमेवर गेले असताना रात्री २ वाजता हा हल्ला झाला. राज्याचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबडा यांनी या घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर दरभा येथून सुकमाला जाणाऱ्या मार्गात दहशतवाद्यांनी झाडे तोडून रस्त्यावर टाकली असल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर एसटीएफचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. हे पथक टोटापाडा गावाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात असिस्टंट प्लाटुन कमांडंट कृष्णपालसिंग शहीद झाले. पोलीस दलानेही प्रत्युत्तरात कारवाई केली. (वृत्तसंस्था)
बराच वेळ चकमक सुरू होती. दरम्यान हल्ल्याचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलीस कुमक रवाना करण्यात आली. परंतु नक्षलवादी तेथून पळून गेले. जखमी जवानावर उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Naxal attack; Officer martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.