छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या गाडीवर नक्षलवादी हल्ला, दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 04:20 PM2018-04-09T16:20:23+5:302018-04-09T16:29:37+5:30
छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत.
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत.
बिजापूरजवळील कुत्रु येथे नक्षलविरोधी मोहिम राबवित असताना सीआरपीएफच्या गाडीलाच लक्ष करत नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. तर, पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नक्षलवादविरोधी मोहिमांचे विशेष महासंचालक डीएम अवस्थी यांनी एएनआयशी बोलताना दिली.
#SpotVisuals 2 security personnel dead, 5 injured in IED attack on police party vehicle near Bijapur's Kutru: DM Awasthi, special DG, anti-naxal operations #Chhattisgarh (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/XcfEIQ5h9B
— ANI (@ANI) April 9, 2018
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्य़ातच आयईडीच्या स्फोटात भूसुरुंगरोधक वाहन उडवून दिल्याच्या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 8 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान म्हणजेच 22 मार्चला दोन महिलांसह 14 नक्षलवाद्यांना भेज्जी भागातील जंगलातून अटक करण्यात आली होती.
2 security personnel dead, 5 injured in IED attack on police party vehicle near Bijapur's Kutru: DM Awasthi, special DG, anti-naxal operations #Chhattisgarhpic.twitter.com/c0MhiAyei7
— ANI (@ANI) April 9, 2018