झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:36 AM2018-06-27T07:36:46+5:302018-06-27T07:37:05+5:30

झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.

naxal attack on troops in gadhwa district of jharkhand | झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

googlenewsNext

रांची- झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 जवान शहीद झाले. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना गढवामधल्या छिंजो या परिसरात नक्षलवाद्यांचं वास्तव्य असल्याचं समजलं. त्यानंतर अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं इथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, चहूबाजूंनी घेरल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात लावलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. ज्यात 6 जवान शहीद झाले. गढवातले पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 10 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गढवा परिसराला छावणीचं स्वरूप आलं असून, सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दुसरीकडे मंगळवारी झालेल्या नक्षली हल्ल्याच्या आधी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी असाच मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 9 जवान शहीद  झाले होते, तर 6 जवान जखमी झाले. सुकमा हल्ल्यात जवानांवर आयईडी स्फोटानं निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नक्षल्यांनी गोळीबारही केला होता.  

Web Title: naxal attack on troops in gadhwa district of jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.