छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:01 PM2023-11-07T14:01:26+5:302023-11-07T14:01:55+5:30

छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत 22.18% मतदान झाले आहे. 

Naxalites attack voters in Chhattisgarh Assembly Election Update; Center itself taken over, Firing started | छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु

छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, हा भाग नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेतले जाणार आहे. २० पैकी १० मतदारसंघांत ही वेळ आहे. असे असताना मतदारांना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या छायेखाली मतदानाला यावे लागत आहे. 

आज दुपारपर्यंत तीन ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ले केले आहेत. एका ठिकाणी आयईडी बॉम्बस्फोट करण्यात आला. यामध्ये एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. तर दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर गोळीबार आणि केंद्र ताब्यात घेण्यात आले आहे. 

नारायणपूरमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. दोन्ही बाजुने गोळीबार केला जात आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळविला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरने सुरक्षा दलाची तुकडी रवाना करण्यात आली आहे. 

सुकमामध्ये नक्षलवाद्यांना मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर गोळीबार करून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. कोंटा पोलिस ठाणे क्षेत्रातील बंडामध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये फायरिंग झाली. तसेच दुरमा आणइ सिंगारामच्या जंगलातून नक्षल्यांनी मोर्टार डागले होते. छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत 22.18% मतदान झाले आहे. 

Web Title: Naxalites attack voters in Chhattisgarh Assembly Election Update; Center itself taken over, Firing started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.