नक्षलवाद्यांना भिडला सीआरपीएफचा "शेर", आई म्हणते मला गर्व
By admin | Published: April 25, 2017 12:11 PM2017-04-25T12:11:33+5:302017-04-25T12:28:02+5:30
शेर मोहम्मद जखमी अवस्थेतही नक्षलवाद्यांवर तुटून पडले आणि त्यांना यमसदनी धाडलं
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 25 - नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत. जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. घेरलं असतानाही जखमी अवस्थेत जवानांनी मुकाबला करत नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घालून त्यांना ठार केलं. यामधील एक जवान आहेत कॉन्स्टेबल शेर मोहम्मद. शेर मोहम्मद जखमी अवस्थेतही नक्षलवाद्यांवर तुटून पडले आणि त्यांना यमसदनी धाडलं. आपल्या मुलाचा आपल्याला गर्व असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे. शेर मोहम्मद यांच्या गावक-यांसहित संपुर्ण देश जवानांसाठी प्रार्थना करत आहेत.
रुग्णालयात बोलताना शेर मोहम्मद यांनी सांगितलं की, "मी स्वत: दोन-तीन नक्षलवाद्यांच्या छातीत गोळी घातली. जे जवान जखमी झाले होते त्यांना खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठलं. त्यानंतर आम्हाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने येथे आणण्यात आलं. मला कमरेत आणि गुडघ्याला जखम झाली आहे". शेर मोहम्मद यांनी सांगितलं की मशीन गन त्यांच्या कमरेला लागली असून त्यांमुळे त्यांना प्रचंड वेदना होता आहेत. "आपल्याला हल्ल्याची काहीच सूचना देण्यात आली नव्हती, फक्त रस्त्याचं काम पुर्ण करुन घ्यायचं आहे एवढंच सांगण्यात आलं होतं", अशी माहिती शेर मोहम्मद यांनी दिली आहे.
My son killed 5 Naxals.Proud of my son, entire village is praying for him: Fareeda, mother of CRPF constable Sher Mohammed injured in #Sukmapic.twitter.com/IuV1QwzWWh
— ANI (@ANI_news) April 25, 2017
आधी गावकऱ्यांना पाठवले, मग हल्ला केला!
शेर मोहम्मद यांनी सांगितले की, ‘आम्ही बंदोबस्तावर असताना ३०० नक्षलवाद्यांनी आमच्या गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांत दोन महिलांही होत्या. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होते. आम्हीही तडाखेबाज पलटवार केला. यात १२ हून अधिक नक्षली मारले गेले.’ अन्य एका जखमी जवानाने सांगितले की, ‘नक्षलवाद्यांनी आधी आमच्या मागावर गावकऱ्यांना पाठवून, आमचा ठावठिकाणा घेतला. हल्लेखोरांत काही महिलाही होत्या.’
Pictures of 25 CRPF personnel who lost their lives in #Sukma Naxal attack yesterday pic.twitter.com/o6gnS6bxIR
— ANI (@ANI_news) April 25, 2017
सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत, हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे निर्धारपूर्वक सांगितले आहे. दरम्यान शहीद जवानांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Home Minister Rajnath Singh and Chhattisgarh CM Raman Singh at Wreath laying ceremony of 25 CRPF Personnel who lost their lives in #Sukmapic.twitter.com/ZZBych0e4h
— ANI (@ANI_news) April 25, 2017
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला होय.
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.