'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:35 PM2019-04-16T18:35:21+5:302019-04-16T18:36:56+5:30

नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. 

'Naxalites, leaving the bullet route & accept the Democracy appeal by Ramdas Athvale | 'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'

'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'

Next

रायपूर - नक्षलवाद्यांना जर गरीब आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नक्षलवाद सोडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना केलं आहे. तसेच नक्षलवाद्यांनी बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा असंही आठवले म्हणाले. 

छत्तीसगडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ११ जागा असून त्यापैकी २ जागांवर रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे तर अन्य ९ जागांवर भारतीय जनता पार्टीला आरपीआयने पाठिंबा दिला आहे. 

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या यंदा किमान 8 जागा निश्चित निवडून येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले असून त्यांना पुन्हा केंद्रात देशसेवेची संधी देण्यासाठी भाजप एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केले. नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा आणि त्यांच्या गाडीचालकाचा मृत्यू झाला होता तर तीन जवान शहीद झाले होते.
 

Web Title: 'Naxalites, leaving the bullet route & accept the Democracy appeal by Ramdas Athvale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.