छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, 11 जवान शहीद
By admin | Published: March 11, 2017 01:11 PM2017-03-11T13:11:14+5:302017-03-11T13:25:26+5:30
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. यात 11 जवान शहीद झालेत.
Next
ऑनलाइन लोकमत
सुकमा, दि. 11 - छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना आहे.
शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या बातमीला मुख्यमंत्री रमन सिंग यांनी देखील दुजोरा दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून घेतली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली.
PM Modi speaks to Home Minister Rajnath Singh on the situation in Sukma, the latter will be going to Sukma to take stock of the situation.
— ANI (@ANI_news) March 11, 2017
Prime Minister Narendra Modi offers condolences to the families of CRPF personnel killed in Sukma Maoist attack. pic.twitter.com/XpyDXdpfbF
— ANI (@ANI_news) March 11, 2017
Chhattisgarh: According to latest information, 9 CRPF jawans have lost their lives in Maoist attack in Sukma says CM Raman Singh pic.twitter.com/lcrDL5cAyi
— ANI (@ANI_news) March 11, 2017