नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन, ताब्यात असलेल्या जवानाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:57 AM2021-04-07T08:57:32+5:302021-04-07T08:59:33+5:30
Naxals attack in Bijapur, Chhattisgarh : बिजापूरमधील चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
रायपूर - शनिवार, ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी (Naxals ) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले होते. या चकमकीदरम्यान, नक्षलवाद्यांनी एका जवानाला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेले होते. तेव्हापासून या जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या जवानाबाबत आता नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून माहिती दिली आहे. (The Naxals called the journalist and told him about the one jawan is in their custody)
बिजापूरमधील पत्रकार असलेल्या गणेश मिश्रा यांनी त्यांना नक्षलवाद्यांचा दोन वेळा फोन आल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, मला नक्षलवाद्यांचा दोनवेळा फोन आला आहे. त्यांनी एक जवान आपल्या ताब्यात असल्याचे सांगितले आहे. या जवानाला गोळी लागली होती. त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. त्याची दोन दिवसांत सुटका केली जाईल. या जवानाचे फोटो आणि व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध केले जातील.
I received two calls from Naxals that one jawan is in their custody. They said the jawan received bullet injury&was given medical treatment,& he'll be released in 2 days. They said a video&photo of jawan to be released soon: Ganesh Mishra, a journalist from Bijapur, Chhattisgarh pic.twitter.com/2lXRNnfggX
— ANI (@ANI) April 7, 2021
छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जोनागुडा गावाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. तर काही जवान जखमी झाले होते. या चकमकीनंतर सीआरपीएफच्या २१० कोब्रा बटालियनमधील जवान राकेश्वर सिंह मन्हास बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नक्षल्यांच्या ताब्यात असलेल्या जवानाला सोडण्यासाठी त्यांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना मध्यस्थीची गरज भासत असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या चकमकीनंतर मारल्या गेलेल्या जवानांकडील शस्त्रे नक्षल्यांनी पळवून नेली. त्यात १४ अत्याधुनिक रायफली आणि दोन हजारावर काडतुसांचा समावेश आहे. त्याचा एक फोटोही दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने जारी केला आहे.