नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:33 PM2024-10-17T15:33:08+5:302024-10-17T15:34:51+5:30
Nayab Singh Saini takes oath as Haryana Chief Minister : नायब सिंह सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nayab Singh Saini takes oath as Haryana Chief Minister : चंदीगड : हरयाणामध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. नायब सिंह सैनी हे पुन्हा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. गुरुवारी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते.
नायब सिंह सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनिल विज यांनी मंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तसेच, यावेळी दोन महिला आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची मुलगी आरती राव आणि माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात व तोशाम मतदारसंघाच्या आमदार श्रुती चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
'या' नेत्यांना मिळाले मंत्रिमंडळात स्थान
अनिल विज, कृष्ण लाल पंवार, विपुल गोयल, राव नरवीर सिंह, महिपाल ढांडा, श्रुति चौधरी, अरविंद शर्मा, श्याम सिंह राणा, रणबीर गंगवा, कृष्ण बेदी, गौरव गौतम, आरती राव, राजेश नागर यांना हरयाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे सांगितले जात आहे.
BJP MLAs Krishan Lal Panwar, Rao Narbir Singh, Mahipal Dhanda and Vipul Goel take oath as cabinet ministers in the Haryana government pic.twitter.com/dvr1wZLQkL
— ANI (@ANI) October 17, 2024
बहुमताने सरकार स्थापन
दरम्यान, हरयाणात गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने यावेळी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत.याशिवाय, दोन जागा इंडियन नॅशनल लोकदलाच्या खात्यात गेल्या आहेत.