NCB Sameer Wankhede : मला समन देण्यात आलेलं नाही, करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नाही - समीर वानखेडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:05 AM2021-10-26T09:05:29+5:302021-10-26T09:06:03+5:30

NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

NCB Sameer Wankhede: I was not summoned, the allegations made are baseless - Sameer Wankhede | NCB Sameer Wankhede : मला समन देण्यात आलेलं नाही, करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नाही - समीर वानखेडे

NCB Sameer Wankhede : मला समन देण्यात आलेलं नाही, करण्यात आलेल्या आरोपांत तथ्य नाही - समीर वानखेडे

Next
ठळक मुद्देवानखेडे यांनी २५ कोटी रूपयांच्या डीलच्या प्रकरणाचं खंडन करत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं.

NCB Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं साईल यांचा दावा आहे. या आरोपांमुळे समीर वानखेडे यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्लीला पोहोचल्यानंतर वानखेडे यांनी आपल्याला समन बजावण्यात आला नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी २५ कोटी रूपयांच्या डीलच्या प्रकरणाचं खंडन करत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं. तसंच आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचं आपण उत्तर देऊ, असंही  ते म्हणाले. "मला समन देण्यात आलेलं नाही. मी या ठिकाणी एका वेगळ्या कामासाठी आलो आहे. माझ्या विरोधात करण्यात आलेले आरोप निराधार आहेत," असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं.

 
अंतर्गत चौकशी
या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यानं वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे. वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

Web Title: NCB Sameer Wankhede: I was not summoned, the allegations made are baseless - Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.