‘एनसीसी’च्या मुलींनाही हवाईदलात समान संधी
By admin | Published: May 7, 2017 01:19 AM2017-05-07T01:19:23+5:302017-05-07T01:19:23+5:30
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीला जाण्याचे दरवाजे खुले झाले
आहेत.
तिन्ही सैन्यदलांमधील भरतीसाठी ‘कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन’ (सीडीएस) ही परीक्षा घेतली जाते. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’कडून घेतली जाणारी तोंडी मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशी तीन टप्प्यांमध्यो होते.
‘एनसीसी’मध्ये सहभागी होऊन ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या उमेदवारांना यात लेखी परीक्षा न देता थेट तोंडी मुलाखतीला बोलाविले जाते. ही सवलत आतापर्यंत फक्त पुरुष उमेदवारांनाच मिळत असे. हवाईदलाने आता ही सवलत महिलांनाही देण्याचे ठरविल्याने ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलीही यापुढे हवाईदलातील भरतीसाठी ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’च्या तोंडी मुलाखतीसाठी थेट बोलाविल्या जातील. यंदाच्या ‘सीडीएस’ परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी व अर्जस्वीकृती २० मेपासून सुरु होत असून ती १५ जूनपर्यंत सुरु राहील.
‘एनसीसी’ केलेल्या विद्यार्थ्यांनी हवाईदलात सामिल व्हावे यासाठी आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्यांना भरतीच्या वेळी थेट मुलाखतीसाठी बोलावण्याची पद्धत आम्ही सुरु केली. यातही समानता असावी यासाठी आता मुलांप्रमाणे मुलींनाही ही सवलत देण्यात येणार आहे. परिणामी ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधील मुलीही आता हवाईदलाच्या भरतीमध्ये मुलांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकतील.
सैन्यदलांत अत्यल्प महिला
तिन्ही सैन्यदलांमध्ये आणि त्यातही अधिकाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. १३ लाखांच्या सैन्यदलांमध्ये ५९,४०० अधिकारी आहेत. त्यात सर्वाधिक १,३५० महिला अधिकारी हवाईदलात आहेत. लष्करात १,३०० तर नौदलात ४५० महिला अधिकारी आहेत.
फ्लार्इंग आॅफिसर असलेल्या अवनी चतुवर्दी, भावना कांत आणि मोहना सिंग या तीन महिला गेल्या वर्षी १८ जून रोजी प्रथमच हवाईदलात लढाऊ विमानाच्या वैमानिक म्हणून दाखल झाल्या होत्या.