बाळाच्या अपहरण प्रकरणी तपासाला गती द्या राष्ट्रवादीची मागणी : सामान्य रूग्णालयात भेट

By Admin | Published: March 11, 2016 10:24 PM2016-03-11T22:24:01+5:302016-03-11T22:24:01+5:30

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाळाच्या अपहरणाच्या घटनेस पाच दिवस होऊनही पोलीस तपासात फारशी प्रगती नाही. पीडित महिला नसरीन बानो याची परिस्थिती तर गंभीर असून तिला आपले बाळ हवे आहे. या प्रकरणी पोलीस तपासाला गती यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस पार्टीच्या माजी महानगर अध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, युवती अध्यक्ष कल्पीता पाटील, ममता तडवी, सुषमा चौधरी, वंदना खराटे, रसीदा पटेल आदींनी केली आहे. या प्रश्नी जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन तेथे नसरीन बानो या महिलेची भेटही त्यांनी घेतली. यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

NCP demand to speed up investigation of child abduction case: visit to common hospital | बाळाच्या अपहरण प्रकरणी तपासाला गती द्या राष्ट्रवादीची मागणी : सामान्य रूग्णालयात भेट

बाळाच्या अपहरण प्रकरणी तपासाला गती द्या राष्ट्रवादीची मागणी : सामान्य रूग्णालयात भेट

googlenewsNext
गाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाळाच्या अपहरणाच्या घटनेस पाच दिवस होऊनही पोलीस तपासात फारशी प्रगती नाही. पीडित महिला नसरीन बानो याची परिस्थिती तर गंभीर असून तिला आपले बाळ हवे आहे. या प्रकरणी पोलीस तपासाला गती यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस पार्टीच्या माजी महानगर अध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, युवती अध्यक्ष कल्पीता पाटील, ममता तडवी, सुषमा चौधरी, वंदना खराटे, रसीदा पटेल आदींनी केली आहे. या प्रश्नी जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन तेथे नसरीन बानो या महिलेची भेटही त्यांनी घेतली. यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

इन्फो-
सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणार
सामान्य रूग्णालयात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लकवरच सुरू केले जातील असे डॉ. पाटील यांनी महिला शिष्ट मंडळास दिले. यावेळी त्यांनी मनुष्य बळाची कमतरता, महिलांसाठीचे स्वतंत्र हॉस्पिटल याची माहिती दिली. मुख्यमंत्री आरोग्य शिबिरासाठी जळगावी आले होते. त्यावेळी त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला भेट दिली असती तर त्यांनी येथील समस्या लक्षात आल्या असत्या. हॉस्पिटलला विविध सुविधा मिळाव्यात अशी मागणी महिला पदाधिकार्‍यांनी केली.

Web Title: NCP demand to speed up investigation of child abduction case: visit to common hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.