समाजवादी पक्षासोबत युती करण्यास राष्ट्रवादी उत्सुक

By admin | Published: September 29, 2014 11:16 AM2014-09-29T11:16:10+5:302014-09-29T12:33:06+5:30

काँग्रेससोबतची पंधरा वर्षांची आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या समाजवादी पक्षासोबत युती करण्यास उत्सुक असून यासंदर्भात दोन्ही पक्षांत बोलणी सुरू असल्याचे वृत्त आहे

NCP is keen to combine with the Samajwadi Party | समाजवादी पक्षासोबत युती करण्यास राष्ट्रवादी उत्सुक

समाजवादी पक्षासोबत युती करण्यास राष्ट्रवादी उत्सुक

Next
>युतीसंदर्भात बोलणी सुरू 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ -  काँग्रेससोबतची पंधरा वर्षांची आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या समाजवादी पक्षासोबत युती करण्यास उत्सुक असून यासंदर्भात दोन्ही पक्षांत बोलणी सुरू असल्याचे वृत्त आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत लढण्यासंदर्भात राष्ट्रवादीने चर्चा सुरू केली आहे.
'छोट्या व समविचारी पक्षांनी आमच्यासोबत यावे, जेणेकेरून एकाच विचारधारेच्या आधारावर आम्ही निवडणूक लढवू शकू, असे आमचे कायम मत होते, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. आम्ही सपाला काही जागांची ऑफरही दिली होती, मात्र तेव्हा ते काँग्रेससोबत बोलणी करण्यात मग्न होते. विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलयाने आता आमच्या हातात फारसा वेळ नाही, तरीही आम्ही सपाशी बोलून गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
यापूर्वी काँग्रेसने सपासोबत निवडणूक लढवण्याचा तसेच सपासाठी आठ जागा सोडण्याचा निर्णयही जाहीर केला होता. मात्र, शुक्रवारी ही आघाडी अचानक संपुष्टात आली. त्यानंतर अवघ्या दिवसानंतर ही राष्ट्रवादी- सपा एकत्र येण्याबद्दलची ही चर्चा सुरू झाली आहे. सपाच्या नेत्यांनी हा बातमीला दुजोरा दिला आहे. याबाबत आपण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असून लवकरच यासंदर्भात घोषणा होऊ शकते असेही सपाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

Web Title: NCP is keen to combine with the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.