NCP vs BJP: "मोदी सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारांचा वाईट काळ सुरू झाला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:37 PM2022-09-01T19:37:31+5:302022-09-01T19:45:55+5:30
मोदी सरकारच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या वाढल्याचाही केला दावा
NCP vs BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन तर आता हे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्या व बेरोजगारांसाठी वाईट काळ सुरू झाला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. काल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे, असा दावा करण्यात आल्याचे महेश तपासे म्हणाले. त्याचाच आधार घेत तपासे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्व्हे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.#NCP
— NCP (@NCPspeaks) September 1, 2022
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली देशात सरकार आले. तेव्हापासून मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वेनुसार रोजंदारी करणार्या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या जास्त आहे. हे प्रमाण आता वाढत जात आहे. याचाच अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही", असा आरोपही महेश तपासे यांनी केला.
मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकारने ते भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले, असेही महेश तपासे म्हणाले.
— NCP (@NCPspeaks) September 1, 2022
"नोटाबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच. पण याशिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आणि नोकर्यांना मुकावे लागले. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले", असा थेट आरोप तपासे यांनी केला.