राष्ट्रवादीच सर्वांगीण विकास करणार
By admin | Published: October 10, 2014 02:54 AM2014-10-10T02:54:47+5:302014-10-10T02:54:47+5:30
बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई : बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. विकासाची कामे करण्याची धमक असल्याने जनता राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने विजयी करेल, असा विश्वास वरळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
बीडीडी चाळ - १ येथून असंख्य कार्यकर्ते व समर्थकांसमवेत पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी मतदारांशी संपर्क साधून आवाहन करताना ते म्हणाले, ‘या परिसरात बौद्ध समाजाची संख्या लक्षणीय असल्याने आपण विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त बुद्धविहारांचे काम केले आहे. त्याचप्रमाणे लादीकरण, सोसायटीचे नूतनीकरण, व्यायामशाळा बांधल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या आहेत.’ त्यानंतर गोपाळनगर परिसरातील काढलेल्या पदयात्रेत महिलांसह परिसरातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होते. या ठिकाणी एसआरए योजनेचा लाभ मिळालेल्या रहिवाशांनी अहिर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)