नामपूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
By Admin | Published: September 15, 2015 06:47 PM2015-09-15T18:47:32+5:302015-09-16T22:40:13+5:30
नामपूर : येथील साक्री चौफुलीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. या ठिकाणी सरकारविरोधात संतप्त शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनाचे नेतृत्व खेमराज कोर, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी केले.
नामपूर : येथील साक्री चौफुलीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. या ठिकाणी सरकारविरोधात संतप्त शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनाचे नेतृत्व खेमराज कोर, अशोक सावंत, नामदेव सावंत, संजय चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी केले.
नामपूरला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष शिवाय शेळ्या, मेंढ्या जनावरे आंदोलनात सहभागी झाले होते. उपस्थित शेतकर्यांसमोर सरपंच प्रमोद सावंत, प्रवीण सामंत, रवींद्र धोंडगे, कडू धोंडगे, कारभारी मोरे, ॲड. रेखा शिंदे, जितेंद्र सूर्यवंशी, पंढरीनाथ आहिरे, शशिकांत कोर, दीपक सावंत, प्रल्हाद आहिरे, राघो पाटील, जानकी ठाकरे, पंचशीला खरे, डॉ. नरेश गायकवाड, प्रवेश ठाकरे, महेश धांेडगे, शशिकांत आहिरे, हेमंत कोर यांनी मनोगत व्यक्त केले. खेमराज कोर, संजय चव्हाण, अशोक सावंत यांनी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. ११ वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल पोलीस प्रशासनाने सकाळी ८ वाजेपासूनच घेतली होती. आंदोलन जरी राष्ट्रवादीचे असले तरी मनसे, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी हजर होते. यामुळे नामपूर भागातील दुष्काळाची तीव्रता अधिक दिसत होती. स्थानिक सेना-भाजपा नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्गात या नेत्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. या आंदोलनात शेळ्या, मेंढ्या व जनावरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. दुपारी २ वाजेनंतर शेतकर्यांची गर्दी वाढतच असल्यामुळे पुढे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून पोलीस ठाण्यात पाठवले. यानंतर कलम ६८ प्रमाणे अटक करून कलम ६९ प्रमाणे सर्वांना सायं. ४ वाजेपर्यंत सोडून दिले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भावराव काळे, पोलीस पाटील बाजीराव सावंत, स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)
---
फोटो कॅप्शन- १)नामपूरला आंदोलनात मार्गदर्शन करताना खेमराज कोर, २) नामपूरला जेलभरो आंदोलनात अटक करून घेताना माजी आमदार संजय चव्हाण, अशोक सावंत, आमदार दीपिका चव्हाण, खेमराज कोर, ॲड. रेखा शिंदे, नामदेव सावंत, सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते.