द्वारका चौकात राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला कार्यकर्ते ताब्यात : सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, टायर पेटवून वाहतूक रोखली

By admin | Published: February 3, 2016 12:28 AM2016-02-03T00:28:54+5:302016-02-03T00:28:54+5:30

नाशिक : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना चौकशीअंती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली. या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २) द्वारका चौकामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी निदर्शने क रत रास्ता रोकोचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

NCP's path to stop Dwarka road blockade: activists to try to burn image of government | द्वारका चौकात राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला कार्यकर्ते ताब्यात : सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, टायर पेटवून वाहतूक रोखली

द्वारका चौकात राष्ट्रवादीचा रास्ता रोको फसला कार्यकर्ते ताब्यात : सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, टायर पेटवून वाहतूक रोखली

Next
शिक : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना चौकशीअंती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली. या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २) द्वारका चौकामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी निदर्शने क रत रास्ता रोकोचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
दुपारी बारा वाजेच्या सुमारास द्वारका चौकात काही नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येऊन जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. यावेळी कार्यक र्त्यांनी फडणवीस सरकारचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पुतळा जप्त केला. दरम्यान, कार्यक र्त्यांनी प्रतीकात्मक पुतळा रस्त्यावर आपटून काठ्या मारत तोडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे रस्त्यावर दोन ते तीन टायर पेटविले आणि पेट्रोलही रस्त्यावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अचानकपणे द्वारकाला जाळपोळ व कार्यकर्त्यांच्या झालेल्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र पळापळ होत असल्याने एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी असलेले दंगल नियंत्रण पथकाचे जवान व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी आंदोलकांना ताब्यात घेत वाहनांमध्ये डांबले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्‍यांनी कार्यकर्त्यांचा रास्ता रोको हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांपैकी अंबादास खैरे, छबू नागरे, नगरसेवक समाधान जाधव, रंजना पवार, कविता कर्डक, नाना पवार, हेमंत शे˜ी, वैभव देवरे, शोभा मगर, बालम पटेल, प्रतिभा पवार, महेश भामरे आदिंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सुमारे वीस मिनिटे कार्यकर्त्यांनी द्वारका चौकात भाजपा सरकारविरोधी घोषणा देत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धरपकड सुरू झाल्याने द्वारका चौकात काही प्रमाणात तणावाचे वातावरण पसरले होते.

फोटो क्रमांक :- ७२ / ७३ / ७६ / ७७ /७८

Web Title: NCP's path to stop Dwarka road blockade: activists to try to burn image of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.