चिक्की प्रकरणी राष्ट्रवादीचा रास्तारोको
By admin | Published: June 29, 2015 12:37 AM2015-06-29T00:37:55+5:302015-06-29T00:37:55+5:30
जळगाव : महिला व बालकल्याण विभागाने २०६ कोटींची केलेली खरेदी व सदोष चिक्कीप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रविवारी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
Next
ज गाव : महिला व बालकल्याण विभागाने २०६ कोटींची केलेली खरेदी व सदोष चिक्कीप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे रविवारी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमानंतर दुपारी आकाशवाणी चौफुलीवर आंदोलन झाले. मात्र आंदोलक येण्यापूर्वीच चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी भाजपा सरकार व पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आंदोलन सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलिसांनी ३ महिलांसह ३० आंदोलकांना अटक केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)