अपक्ष आमदारांबाबत राष्ट्रवादीची कोंडी

By admin | Published: September 24, 2014 04:34 AM2014-09-24T04:34:41+5:302014-09-24T04:34:41+5:30

पाच वर्षांपूर्वी ज्या अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते त्यांना काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याचा विचार होऊ शकतो

NCP's stand on independent MLAs | अपक्ष आमदारांबाबत राष्ट्रवादीची कोंडी

अपक्ष आमदारांबाबत राष्ट्रवादीची कोंडी

Next

यदु जोशी, मुंबई
पाच वर्षांपूर्वी ज्या अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते त्यांना काँग्रेसच्या कोट्यातील जागा देण्याचा विचार होऊ शकतो, अशी भूमिका काँग्रसने घेतल्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अपक्ष आमदारांपैकी जयकुमार गोरे, वसंतराव चव्हाण, भारत भालके आणि शिरीष कोतवाल यांचे मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या कोट्यात आहेत. या चौघांना तिकीट द्यायचे तर काँग्रेसला ते राष्ट्रवादीकडून बदलून घ्यावे लागणार आहेत. तर राष्ट्रवादीत आलेल्या अपक्ष आमदारांपैकी दिलीप सोपल, सुरेश देशमुख, मानसिंगराव नाईक, कृषिभूषण साहेबराव पाटील, बाबासाहेब पाटील, शरद गावित आणि मौलाना मुफ्ती यांचे मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात आहेत.
आपल्याकडील चार अपक्षांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस त्या बदल्यात चार जागा सोडू शकेल. तरीही राष्ट्रवादीतील दोन अपक्षांचा प्रश्न निर्माण होणार आहे. ते खेचून आणण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असेल. याशिवाय राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेल्या एका मतदारसंघातील अपक्ष आमदार लवकरच काँग्रेसमध्ये येऊ शकतात.

Web Title: NCP's stand on independent MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.