जिल्हाधिकार्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर राष्ट्रवादीचा थाळीनाद रहदारीचा खोळंबा : युती सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप
By admin | Published: October 29, 2015 10:02 PM2015-10-29T22:02:32+5:302015-10-29T22:02:32+5:30
जळगाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.
Next
ज गाव : शेतकरी व विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, महागाई वेगात वाढत आहे. मात्र कुंभकर्णी झोप घेत असलेले सरकार अजूनही जागे होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी दुपारी थाळीनाद व हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद करण्यात आला.रा.कॉ.कार्यालयापासून मोर्चाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, ॲड.रवींद्र भैया पाटील, महानगराध्यक्ष परेश कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, दीपाली पाटील, पं.स.सदस्या लताबाई पाटील, विशाल देवकर, वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गावर दाखल झाले.महामार्गावर थाळीनाद व घोषणाबाजीराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आकाशवाणी चौकात येत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी थाळीनाद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मोदी सरकार हाय...हाय.., खंडणी सरकार हाय...हाय, एक वर्षात केले काय...खाली डोके वर पाय... अशी घोषणाबाजी सुरू केली.महामार्गावर रहदारीचा खोळंबाआंदोलकांनी जवळपास १५ ते २० मिनीटे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. २० मिनीटानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. प्रवेशद्वार बंद असल्याने या ठिकाणी रस्त्यावर आंदोलक एकत्र आले. या ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली. केंद्र व राज्य शासनावर उगारला आसूडआंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. या ठिकाणी पुन्हा थाळीनाद व ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या दिशेने वळविला. कार्यालयाच्या समोर बराच वेळ आंदोलक उभे होते.जिल्हाधिकार्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर आंदोलनजिल्हाधिकारी या दालनात नसल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी थेट दालनात प्रवेश केला. आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना तत्काळ बोलविण्याची मागणी केली. मात्र दहा मिनीटे जिल्हाधिकारी दालनात न आल्याने महिला पदाधिकार्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीसमोर थाळीनाद आंदोलन सुरू केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी महिलांनी सुरू केली.